इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शनने (IBPS) ऑफिसर स्केल I (PO), ऑफिस असिस्टंट – मल्टीपर्पज (लिपिक) आणि रीजनल रूरल बँक (RRB) मधील अधिकारी स्केल II आणि III या पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहा हजाराहून अधिक रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर भेट देऊ शकतात आणि २८ जून २०२१ पूर्वी वरील पदांसाठी आपला अर्ज भरू शकतात. देशभरात एकूण १० हजार ३६८ रिक्त जागा आरआरबीमध्ये भरल्या जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या पदांसाठी भऱण्यात येणारे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार असून आणि उमेदवारांची निवड प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना ७ जून रोजी देण्यात आली होती आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जून निश्चित करण्यात आली आहे. प्रिलिम्सची परीक्षा १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रिलिम्सची परीक्षा १ ऑगस्ट, ७ ऑगस्ट, ८ ऑगस्ट, १४ ऑगस्ट आणि २१ ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रिलिम्समध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मेन्स परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. प्रोबेशनरी ऑफिसर मेन्सची परीक्षा २५ सप्टेंबर रोजी तर लिपिक मेन्सची परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
वेगवेगळ्या पदांवर भरतीसाठी निर्धारित शैक्षणिक पात्रता देखील वेग-वेगळी आहे. पदानुसार वयोमर्यादा देखील भिन्न आहे. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये सर्व आवश्यक माहिती बघावी लागणार आहे. सर्व पदांसाठी असणाऱ्या अर्जाची लिंकदेखील वेगळी आहे म्हणजेच उमेदवारांना कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे आणि ते त्यासाठी पात्र आहे हे बघणे आवश्यक आहे.
(IBPS-RRB) IBPS मार्फत 11000+जागांसाठी मेगा भरती [Updated]
IBPS RRB Recruitment 2021
Total: 10466 11753 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) | 5930 |
2 | ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) | 4506 |
3 | ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) | 25 |
4 | ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) | 43 |
5 | ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) | 09 |
6 | ऑफिसर स्केल-II (लॉ) | 27 |
7 | ऑफिसर स्केल-II (CA) | 32 |
8 | ऑफिसर स्केल-II (IT) | 59 |
9 | ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) | 914 |
10 | ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) |
208 |
Total | 11753 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
- पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
- एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021