आता लायसन्ससाठी ड्रायव्हिंग टेस्टची गरज नाही.सरकारचा निर्णय

24

वाहन परवाना बनविण्यासाठी आता तुम्हाला आरटीओ ऑफिसच्या वारंवार फेऱ्या मारायची गरज नाही. कारण, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यासंदर्भात एक नवीन नियम आणत आहे. यानुसार, आता आरटीओ ऑफिसमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज पडणार नाही.

नवीन नियमानुसार, आता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिग ट्रेनिंग स्कूलमध्ये नोंदणी करू शकतात. इथून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर आणि एक टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जारी केल जाईल. म्हणजेच तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज पडणार नाही. जुलै महिन्यापासून हा नवीन नियम लागू होणार आहे.

ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरवरून ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर कुणालाही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. याअंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार आहे. जेणेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील. यासाठीही मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. मात्र, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सना सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. जे सेंटर्स जागा, ड्रायव्हिंग ट्रॅक, आयटी आणि बायोमेट्रिक सिस्टिम व अन्य नियमांतर्गत ट्रेनिंगशी निगडीत आवश्यक बाबी पूर्ण करतील त्यांनाच सरकारकडून मान्यता दिली जाईल. एकदा सेंटरमध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते प्रमाणपत्र संबंधित मोटर व्हेईकल वाहन परवाना अधिकाऱ्याकडे जाईल.