प्रिय शेतकरी बांधवांनो,
आज पर्यंत सीएसीने आपल्याला आपल्या शेतीमध्ये उपयुक्त व शेतीला सुरक्षा देणा—या अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. जसे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,किसान मानधन योजना,प्रधानमंत्री फसल बिमा योजना,इत्यादी पण आता पहिल्यांदाच सीएससी तुम्हाला तुमचा शेतीमाल विकण्यासाठी मदत करणार आहे.
हेाय ! विना झंजट,सरळ व सोप्या पध्दतीने तुमच्या बांधावरून तुमचा शेतीमाल विकला जाणार आहे,आणि या मध्ये सीएससी तुम्हाला पुरेपुर मदत करणार आहे.या कामासाठी शेतक—याकडून कोणतीही फी आकारली जाणार नसून पुर्णत : शेतक—यांना मदत करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे.
या योजनेमध्ये शेतक—यांची नोंदणी करून त्यांच्या शेतमालाची माहिती घेतली जाते आणि त्यांनतर बाजारभावाप्रमाणे शेतक—याचा शेतीमाल विकला जातो.
शेतकरी नोंदणीसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.
1 पॅनकार्ड
2 मतदान कार्ड,लाईट बिल,डायव्हिग लायसन्स कोणतेही एक
3 बॅक पासबुक,कॅन्सल चेक (कोणतेही 1)
आजच आपल्या जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन आपली नोंदणी करून घ्यावी.
टीप :— शेतक—यांकडून नोंदणी किंवा त्यांचा शेतीमाल विकण्यासाठी कोणतीही फी आकरली जाणार नाही.
”जय जवान जय किसान,,