मुल- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष मा.ना.नानभाऊ पटोले व शासनाचे मदत पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या मुल दौऱ्याच्या निमित्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व जि. प.माजी अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या इंधन दर वाढीच्या निषेधार्थ गांधीचौक मुल व पेट्रोल पंप येथे दुपारी १ वाजता मुल तालुका व शहर कांग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध असो असे नारे देऊन निषेध करण्यात आला.

या निषेध मोर्चाचे नेतृत्व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी केले असून मोर्चात तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखरे, मुल बाजार समिती उपसभापती संदीप कारमवार,संचालक अखिल गँगरेड्डीवार, राजेंद्र कन्नमवार, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार,महिला तालुका कांग्रेसच्या अध्यक्ष रुपाली संतोषवार,

मूल शहर कांग्रेस अध्यक्ष विद्यापीठ सिनेट सदश सुनील शेरकी, सोसायटी सभापती पुरुषोत्तम भुरसे, नगर सेवक विनोद कामडे,ललिता फुलझेले, माजी महिला तालुका अध्यक्षा वैशाली पुलावार, माजी जी.प.सदश मंगला आत्राम, त्रिष्ण सुरमवार, ओबीसी कांग्रेसचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, ग्रामीण कांग्रेसचे जेष्ठ नेते दीपक वाढई, संचालक शांताराम कामडे, सरपंच रवींद्र कामडे, यांचेसह तालुका व शहर कांग्रेसचे पदाधिकारी सुरेश फुलझेले, कैलाश चलाख,अन्वर शेख, गणेश रणदिवे,विवेक मुत्यलवार, सुनील गुज्जनवार, उपसरपंच राहुल मुरकुटे, यांचेसह असंख्य कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






