मूल तालुक्यात शिव राज्यभिषेक सोहळा

41

मूल :— तालुक्यात जानाळा,बेंबाळ,मारोडा,ग्रामपंचायतीत शिव राज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात आता 6 जूनचा शिवराज्यभिषेक सेाहळयाचा दिवस यंदाच्या वर्षापासून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होत आहे.

ग्रामपंचायत जानाळा  :- तालुक्यातील जानाळा  येथील ग्रामपंचायतच्या वतीने शिवस्वराज्य दिन सरपंच सरपंच सौ रंजना रविशंकर भोयर उपसरपंच सौ दर्शना राजेंद्र किंनाके सदस्य ईश्वर मारोती वाढई रवींद्र ईश्वर मरापे सौ नीता विनायक नीकोडे शालू रवींद्र कुंभरे व सामाजिक कार्यकर्ते धनराज रामटेके उपस्थित होते

ग्रामपंचायत कार्यालय बेंबाळ :- तालुक्यातील बेंबाळ येथील ग्रामपंचायतच्या वतीने शिवस्वराज्य दिन सरपंच कु.करुणा ताई ऊराडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच,सदस्य,ग्रामविकास अधिकारी,नागरीक आदी उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत आवारात भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवभक्त,राजदंड स्वराज्य गुडी उभारून नमन करण्यात आले. तसेच राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले.यावेळी  गावातील प्रतिष्ठित,नागरिक उपस्थित होते.