मूल येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा

36

मूल : वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली व संजीवन पर्यावरण संस्था मूल यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिन कार्यक्रम येथील पंडीत दिनदयाल उपाध्याय इको पार्क येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे होते. प्रमुख अतिथी म्हणून चिंचपल्लीचे वनपरीक्षेत्राधिकारी वैभव राजुरकर, मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मूलचे क्षेत्र सहाय्यक पी. डी. खनके, वनरक्षक सुभाष मरसकोल्हे, वनरक्षक राकेश गुरनुले, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत केदार, प्रशांत मुत्यारपवार, मनोज रणदिवे उपस्थित होते.
यावेळी पंडीत दिनदयाल उपाध्याय इको पार्क मुल येथील परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन संकल्प गणवीर यांनी केले उपस्थितांचे आभार स्वप्निल आक्केवार, यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी अंकुश वाणी, दिनेश खेवले, प्रतीक लेनगुरे, जय मोहुर्ले, रितेश पिजदुरकर, हर्षल वाकडे, अनुराग मोहुर्ले, रुपेश खोब्रागडे यांनी अथक परिश्रम घेतले.