मुल पोलीसांची धडक कार्यवाही

78

वेगवेगळ्या घटनेत दारूसह १९ लाखाचा ऐवज जप्त
मूल पोलीसांची धडाकेबाज कारवाई
मूल (प्रतिनिधी)
दारूबंदी असल्याची संधी साधून दारूचा अवैद्य व्यवसाय करण्याचे उद्देशाने दारूची वाहतुक करीत असतांना वेगवेगळया दोन घटनेत मूल पोलीसांनी दारूसह १९ लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मूल येथील उत्तम कुमरे, प्रकाश खाडे, भोजराज मुंढरे, श्रावण कुतरमारे, सचिन सायंकार, शंकर तिडके आदि पोलीस कर्मचारी गडीसुर्ला-येसगांव मार्गावरील टि पाईंटवर नाकाबंदी करून उभे असतांना रात्रो ११ वाजताचे सुमारास एमएच-०२-बीडी-८९२१ क्रमांकाच्या होेंडा सिटी कारची तपासणी केली तेव्हा सदर वाहणाच्या मागील सिटवर ठेवलेल्या खोक्यांमध्यें विदेशी कंपनी ३ लाख ८० हजाराची दारू असल्याचे दिसून आली. यावरून पोलीसांनी सदर वाहणाचा चालक ज्ञानदिप उर्फ कालु विजय मसराम रा. डोंगरगांव याला ताब्यात ठेवून अटक केली. सदर घटनेत पोलीसांनी ३ लाख ८० हजाराच्या दारूसह ७ लाख किंम्मतीचे वाहण जप्त केले. तर दुस-या घटनेत नागपूर मूल मार्गावरील उमा नदी पुलासमोर करण्यांत आलेल्या नाकेबंदी दरम्यान एमएच-३४ एएम-७३५१ क्रमांकाच्या टाटा बोल्ट कारची तपासणी केली असता सदर कारच्या मागील सिट आणि डिक्की मध्यें वेगवेगळया कंपनीची २ लाख ६६ हजाराची विदेशी दारू असल्याचे दिसून आले. जिल्हयात दारूबंदी असतांना दारूची वाहतुक करणे गैरकायदेशीर असल्याने पोलीसांनी सदर घटनेत मूल येथील कार चालक अंकुश नंदकिशोर बोडखे याला ताब्यात घेवून कारवाई केली. सदर घटनेत पोलीसांनी २ लाख ६६ हजाराच्या दारूसह टाटा बोल्ट कार आणि दोन मोबाईल असा एकुण ८ लाख ७६ हजार ४०० रूपयाचा ऐवज हस्तगत केला. सदर कारवाई पोलीस कर्मचारी सुरेश ज्ञानबोनवार, अहमद शेख, धनराज, अविनाश दशमवार, दिवाकर वाकडे, संजय जुमनाके, शफीक शेख, एकनाथ करंबे आदिनी केली. सहायक पोलीस अधिक्षक अनुज तारे आणि ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात मूल पोलीसांनी केलेल्या अवैद्य दारू विक्रीच्या कारवाईत एकुण १९ लाख ५६ हजार ४०० हजार रूपयाचा ऐवज हस्तगत केल्याने तालुक्यात दारूचा अवैद्य व्यवसाय करणारे चांगलेच दणाणले आहे.