चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गरीबाच्या दारी

33

मुल- ऐन उन्हाळ्याच्या दिवसात आलेल्या आकस्मिक वादळी वाऱ्यामुळे मूल तालुक्यातील राजोली येथील गरीब मजूर १)लतेश्वर पैकू लेनगुरे २)ईश्वर पैकु लेनगुरे ३) बालाजी पैकू लेनगुरे या तीन भाऊ एकाच सामूहिक कौलारू घरात आपल्या कुटुंबासह राहत होते. नुकत्याच आकस्मिक आलेल्या वादळी हवेमुळे विस्तवाची ठीनगी उडाली आणि काही क्षणांतच सम्पूर्ण घर सामानासह बेचिराख झाल्याने गरीब लेनगुरे कुटुंब ऐन उन्हाळ्याच्या दिवसात बेघर झाले. याची माहिती राजोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील गुज्जनवार यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांना दिली असता बेघर व निराधार गरिबांना बँकेचा आधार म्हणून शेतकरी कल्याण निधी अंतर्गत घर जळालेल्या बेघर झालेले १)तलेश्वर पैकू लेनगुरे रुपये १०,०००/- २) ईश्वर लेनगुरे रु,१०,०००/- ३) बालाजी पैकू लेनगुरे रु,१०,०००/- या तीनही बेघर झालेल्या व्यक्तींना राजोली येथे संतोषशिंह रावत हे प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन चेक द्वारे तात्काळ मदत दिली. असता मध्यवर्ती सहकारी बँक गरीबांच्या दारी अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी बोलून दाखविल्या. मदतीचे चेक देतांना बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांचे सह तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, माजी उपसभापती सुनील गुज्जनवार, प्रतिष्ठित नागरिक सुरेश पा. ठिकरे, राजोली सरपंच जितेंद्र लोणारे,उपसरपंच गजानन ठिकरे,सदश निकिता खोब्रागडे,पल्लवी निकरे,शाम पुटावार, बँकेचे शाखा व्यवस्थापक सतीश रेड्डीवार,सिनिअर अधिकारी नंदू मडावी उपस्थित होते.