जादुटोण्याचा संशय,सहा आरोपीना अटक जूनगावातील घटना

41

काकाला तलवारीने संपवाण्याचा प्रयत्न

मूल :— जादुटोण्याच्या संशयावरून चुलत काकाला तलवार व प्लॅस्टिक फिस्टर बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सोमवारी तारीख 31 मे 2021 पोंभूर्णा तालुक्यातील जूनगावात घडली याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
जुनगाव येथील विलास रघुनाथ भाकरे यांचा पुतण्या श्रीकृष्ण चरणदास भाकरे याचे तीन वर्षीपूर्वी लग्र झाले. लग्न्रानंतर त्यांना अपत्य झाले नाही. चुलत्यांनेच जादुटोणा केल्याच्या संशया वरून काकाला जिवे मारण्याचा कट रचला. अशातच श्रीकृष्ण हा सासुरवाडी कवठी येथील गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीना सोबत घेऊन जुनगावात आला.सोमवारी विलास भोकरे यांच्या घरी गेला. तलवार व बंधुकीचा धाक दाखवत
लाथाबुक्यांनी मारहाण करणे सुरू केले.त्याने जीव वाचविण्याच्या उदेशाने शेजारील घराचा असारा घेतला.त्यामुळे तो बचावला. या घटनेची माहिती मिळताच लागलीच बेंबाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
श्रीकृष्णच्या टोळक्याला पोलिस दिसताच पळून जाण्याचा प्रयत्न सुरू झाला. अशातच गावक—यांच्या सहकार्याने श्रीकृष्ण चरणदास भाकरे (50),नीलेश रमेश पाल )(23)
भूषण विनोद पाल (17) महेश दयाराम फाले (22),निखिल सुरेश ताजणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.