सर्व व्यापारी तसेच दुकानात काम करणाऱ्या सर्वांना वयाचं बंधन न ठेवता लस द्यावी- भाजपाची मागणी

45

मोठ्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली आहे,व्यापारी प्रतिष्ठाण उघडायला सुरवात झाली आहे. प्रतिष्ठान सुरू झाल्यानंतर गर्दी वाढण्याची शक्यता असून या दुकानांमधून अधिक संसर्गाची भीती राहू शकते, व्यापारी तसेच सर्व दुकानांमध्ये काम करणाऱ्या सर्व लहान मोठ्या कर्मचाऱ्यांना लसीचा डोज दिला असल्यास त्यांची तर सुरक्षितता होईलच पण त्यांच्यापासून पण कोणत्याही ग्राहकाला संसर्ग होण्याची भीती राहणार नाही. सध्या 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू आहे, नंतर 18 च्या पुढचं लसीकरण झालं की 45 वरच बंद होते, ऑनलाईन नोंदणी करताना पण मर्यादित नोंदणी सारख्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. करीता व्यापारी तसेच दुकानांतील कर्मचाऱ्यांना स्पेशल कॅम्प घेऊन लवकरात लवकर वयाचं बंधन न ठेवता लसीकरण करणे महत्वाचे वाटते. त्यामुळे आपण मध्यस्थी करून शासनाकडून सर्व व्यापारी आणि तेथील कर्मचारी यांचे लसीकरण करून घ्यावे अशी विनंती मुल व मुल तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून माजी वित्तमंत्री व वनमंत्री आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे कडे केली. भाऊंनी लगेच दूरध्वनीवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेशी संपर्क करून सदर मागणी केली असून लवकरच या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे . नगर परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, प स सभापती चंदू मारगोणवार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, ओ बि सी चे पदाधिकारी राकेश ठाकरे यांची या शिष्टमंडळात विशेष उपस्थिती होती.