जादुटोणा केल्याच्या कारणावरून जबर मारहाण,तालुक्यातील सुशी येथील घटना

41

जादुटोणा केल्याच्या कारणावरून जबर मारहाण

मूल :—कुटूंबावर जादुटोणा केल्याचा संशसावरून एका युवकाने 65 वर्षीय व्यक्तीला रस्तावर अडवून गंभीर जखमी केल्याची घटना  घडली.
तालुक्यातील सुशी येथील बेघर वसाहती मध्ये राहणारे ज्ञानेश्वर मेश्राम (65)सकाळी 7.15 वाजता चे सुमारास सुरेश पेंदाम यंाचे दुकानातून घराकडे परत येत असतांना राकेश भसारकर (30) याने स्वता सोबत कुटुंबावर जादुटोणा केल्याचा आरोप करून ज्ञानेश्वर मेश्राम याला लोखंडी सब्बलीने जबर मारहाण केली .
डोके पाठीवर सब्बलीने जबर मारहाण,केल्याने ज्ञानेश्वर मेश्राम जागीच बेशुध्द झाले. वडीलाला मारहाण झाल्याने बेशुध्द पडल्याचे समजताच मुलगा अमरेश ज्ञानेश्वर मेश्राम याने मित्राच्या सहकार्याने जखमी वडील ज्ञानेश्वर यांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ आणले. ज्ञानेश्वर मेश्राम गंभीर असल्याने प्राथमिक उपचारा नंतर जखमीला चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान सदर घटनेची तक्रार जखमीचा मुलगा अमरेश मेश्राम याने पोलीसात नोंदविताच सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे सहका—यांसह घटनास्थळी दाखल होवून मारहाण करणा—या राकेश भसारकर याला मारण्याकरिता वापरलेल्या सबलीसह त्याचे घरूनच ताब्यात घेतले. जखमी ज्ञानेश्वर मेश्राम हे जादुटोण करणारे व्यक्ती असून डेाळे निकामी झाले शिवाय दहा ते बारा वर्षापूर्वी त्यांनी आपल्या सर्व कुटुंबावर करणी केल्याने आपले कुटुंब सतत वेगवेगळया रोगाने आजारी पडत असते,त्यामुळे आम्ही त्रस्त झाले असून याला सर्वस्वी ज्ञानेश्वर मेश्रामच जबाबदार असल्याने मारहाण केल्याचे राकेश भसारकर यांनी सांगितले.
पोलीसांनी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सतिशसिंह राजपुत सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे यांच्या सहकार्याने करीत आहेत.