मूल (प्रतिनिधी) शेतकरी व सामान्य जनतेच्या हक्काची बँक असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मूल तालुक्यातील चांदापुर येथील शेतकरी आनंदराव तिवाडे ह्यांना म्युकरमायकोसीस आजारावर उपचार करण्यासाठी त्यांच्या कुंटूबियास ४० हजार रूपयाचा धनादेश बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मूल येथील बँकेच्या कार्यालयात देण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, सामाजिक कार्यकर्ते लोमेश नागापुरे, बँकेचे अधिकारी नंदादीप मडावी आणि शाखा व्यवस्थापक वाळके उपस्थित होते.