रिक्षा चालकांना मिळणार आर्थिक मदत आॅनलाईन् फार्म भरणे महत्वाचे

26

 

चंद्रपूर :— कोविड—19 च्या पाश्र्वभूमिवर परवानधारक रिक्षाचालकांना आर्थीक सहाय म्हणून 1 हजार 500 रूपये देण्याबाबत शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आले आहे.सदर लाभ हा लाभाथ्र्याचा बॅंक खात्यामध्ये थेटपणे देण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांना अर्ज सादर करावा,असे आवाहन चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.
अडचण आल्यास या क्रमांकावर साधा संपर्क : आॅनलाईन अर्ज सादर करतांना प्रणालीबाबत अडचण आल्यास चंद्रपूर,उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 07172—272555 या क्रमांकावर कार्यालयील वेळेत संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

ही आहे प्रक्रिया :—
परवानाधारक रिक्षाचालकंान कोणेही कागदपत्र सादर न करता केवळ आॅनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमंाक,अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नमूद करावा लागणार आहे.
सदर महिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल त्यानंतर ज्यंाचे आधार क्रमांक बंक खात्याशी जुळतील त्यांचा लाभ त्वरीत संंबंधित खात्यावर जमा होणार आहे. सदर आॅनलाईन प्रणालीमध्ये कोणाचेही बॅंक खाते क्रमांक विचारले जाणार नाही,याची नोंद घ्यावी.