Home आपला जिल्हा रिक्षाचालकांच्या मदतीची लिंक पोर्टलची दुरुस्ती सुरू आहे. सोमवारी २४ मे २०२१ रोजी...

रिक्षाचालकांच्या मदतीची लिंक पोर्टलची दुरुस्ती सुरू आहे. सोमवारी २४ मे २०२१ रोजी सकाळी ८ वाजता सेवा पुन्हा सुरू

119

 

प्रत्येकी 1,500 रूपये

मूल :— कोरोना निर्बंधातील मदत म्हणून रिक्षाचालकांना मदत देण्यासाठी लागणारी लिंक चालू झालेली आहे.
या लिंकवर जावून परवाना क्रमाकांसह आधार कार्ड,बॅंक खाते क्रमंाक तपशील दिला की ​दीड हजार रूपये बॅंकेत जमा होतील.
सरकारी मदत जाहीर होउुन महिना झाला तरी रिक्षाचालकांना पैसे मिळत नव्हते. सरकारने अशीच मदत जाहीर केलेल्या फेरीवाला,घरेलू कामगार,इमारत बांधकाम मजूर यांच्या खात्यात पैसे जमा झाले तरी रिक्षाचालक मात्र उपेक्षितच राहिला हेाता.
आता परिवहन आयुक्तालयाने लिंक तयार केल्याने ही मदत मिळू शकणार आहे.ही लिंक राज्यातील सर्व परिवाहन विभागाना पाठवण्यात येणार असून सर्व रिक्षाचालकासाठी ती खुली असेल त्यावरून जाउुन रिक्षाचालकाने स्वतचा तपशील द्यायचा आहे की त्यांची छाननी होउुन पैसे संबंधिताच्या बॅंक खात्यात जमा होतील.
सरकारी नियमाप्रमाणे मदत थेट बॅंक खात्यात जमा करायची होती पण एकाही रिक्षाचालकाच्या बॅक खात्याचा तपशील परिवहन विभागाकडे नव्हत दरम्यान,सरकारने पैसे खासगी बॅंकेत जमा केले.

राज्य शासनाने रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेल्या अनुदानासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कार्यपद्धती जाहीर केली. संबंधितांनी https://transport.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्‍यक आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांसाठी अनुदानाची घोषणा केली होती. दरम्यान, शनिवारी सायंकाळी हे पोर्टल कार्यान्वित झाले आहे, असे आरटीओने सांगितले आहे.

कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अर्जदाराने मोबाइल क्रमांक आणि ओटीपीसह लॉग-इन करावे. त्यानंतर आधार क्रमांकाची नोंद करावी. अर्जदार स्वतः परवानाधारक असल्यास सेल्फ हा पर्याय निवडावा. तर वारसाहक्काने प्राप्त परवाना धारकाने वारसा किंवा उत्तराधिकारी हा पर्याय निवडावा. यानंतर रिक्षा क्रमांक आणि लायसन्स क्रमांकाची नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

अर्जदार स्वतः परवानाधारक असल्यास केवळ माहिती नमूद करावी लागेल. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्‍यकता नाही. मात्र, वारसाहक्काने प्राप्त परवाना धारकाने लायसन्स नोंद करणे अनिवार्य नाही. हा अर्ज पूर्ण असल्यास संबंधिताने तो सबमिट करावा. काही प्रकरणात रिक्षाची नोंदणी रद्द करुन वाहन बदली आदेश प्राप्त करून घेतले असल्यास संबंधितांनी कार्यालयात अर्ज सादर करावा.

कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य

सध्याच्या कोविड-१९ साथीच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा परवानाधारकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी १५०० रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

कृपया योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी पुढील टीप वाचा

ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना

  1. कोण अर्ज करू शकेलःमहाराष्ट्र राज्यातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारक.
  2. आवश्यक तपशील:आपले वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट आणि आधार क्रमांक तयार ठेवा.
  3. आधारद्वारे ऑनलाईन लाभः
    1. ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे.
    2. तुमचा आधार लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर पाठविलेल्या ओटीपीच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी केली जाईल.
    3. याचा फायदा थेट आधार लिंक बँक खात्यात वर्ग केला जाईल.
  4. कुटुंब सदस्याच्या नावे परवाना हस्तांतरण:अर्जदाराने “वारसा/ उत्तराधिकारी” हा पर्याय निवडावा व परवान्याची प्रत अपलोड करावी.
  5. अर्जाची स्थितीचा तपास:आपण समान मोबाइल नंबर वापरुन आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
  • आधार अर्ज करण्यासाठी किंवा मोबाइल नंबर अद्यावयात करण्यासाठी नोंदणी केंद्राची यादी – येथे क्लिक करा
  • आधारशी जोडलेल्या बँक खात्याची स्थिती तपासण्यासाठी – येथे क्लिक करा
  • आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकाची स्थिती तपासण्यासाठी – येथे क्लिक करा

अर्जाची वेळ: सकाळी ८ ते रात्री  १०

पोर्टलची दुरुस्ती सुरू आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व आहोत. सोमवारी २४ मे २०२१ रोजी सकाळी ८ वाजता सेवा पुन्हा सुरू केल्या जातील.

योजनेसाठी अर्ज करा

सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न

प्र: माझ्याकडे आधार कार्ड नसल्यास काय करावे?
उत्तर: आधार क्रमांक उपलब्ध नसेल तर कृपया तुमच्या जवळच्या नोंदणी केंद्रात अर्ज करा. आपल्या जवळील आधार नोंदणी केंद्रे तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

प्र. माझा मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला नसेल तर काय करावे?
उत्तर: आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर सत्यापित करण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा. आधारमध्ये मोबाइल नंबर अद्ययावत करण्यासाठी आपल्या जवळच्या आधार अद्ययावत केंद्राला भेट द्या. कृपया आपल्या जवळची नोंदणी / अद्ययावत केंद्र शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

प्र. माझे बँक खाते आधारशी जोडले गेलेले नसेल तर काय करावे?
उत्तर: आधार लिंक केलेल्या बँक खात्याची स्थिती सत्यापित करण्यासाठी येथे क्लिक करा. आपण आपले बँक खाते आधारसह अद्ययावत करण्यासाठी आपल्या बँकेत देखील भेट देऊ शकता आणि नंतर योजनेसाठी अर्ज करू शकता.

प्र. मी आधार किंवा आधार लिंक केलेला मोबाइल नंबर / बँक खात्याशिवाय योजनेसाठी अर्ज करू शकतो?
उत्तर: होय, आपण अद्याप ऑफलाइन मोडद्वारे योजनेसाठी अर्ज करू शकता. ऑफलाईन मोडद्वारे अर्ज करण्यासाठी , १ जून २०२१ नंतर कार्यालयीन वेळेत कृपया आपल्या आरटीओ कार्यालयाला भेट द्या.

प्र. अर्ज करण्यासाठी मला मदत हवी असेल किंवा मी अर्ज करण्यास असमर्थ असल्यास काय?
उत्तर: तुम्ही येथे क्लिक करून वापरकर्त्याच्या मार्गदर्शकाचा संदर्भ घेऊ शकतात. आपण प्रक्रिया व्हिडिओ येथे देखील तपासू शकतात.

प्र. मी ऑनलाइन अर्ज केला आहे, मला मदत निधी कधी व कोठे मिळेल?
उत्तर: आपल्या अर्जाचा आढावा घेतल्यानंतर आणि अर्ज मंजूर झाल्यावरच तुम्हाला आधार लिंक असलेल्या बँक खात्यात मदत निधी मिळेल.

प्र. मला अद्याप मदत निधी मिळालेला नाही?
उत्तर: आपण येथे क्लिक करून करून आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

प्र. माझा अर्ज नाकारल्यास काय करावे?
उत्तर: कृपया आरटीओ अधिकाऱ्याने अर्ज नाकारल्याचे कारण वाचा व (लागू असल्यास) अर्जात आवश्यक त्या दुरुस्त्या करून पुन्हा अर्ज करा.

प्र. माझा अर्ज दुरुस्तीसाठी पाठविला गेला तर काय करावे?
उत्तर: कृपया आरटीओ अधिकाऱ्याने अर्ज दुरुस्तीस पाठविण्याचे कारण वाचा व (लागू असल्यास) अर्जात आवश्यक त्या दुरुस्त्या करून पुन्हा अर्ज करा.

प्र. मी माझ्या अर्जाच्या स्थितीबद्दल समाधानी नसल्यास काय करावे?
उत्तर: आपली तक्रार नोंदविण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.