बल्लारपूर पोलिसांनी पकडली दीड लाखाची देशी दारू

24

चंद्रपूर : बल्लारपूर पोलिसांनी शनिवारी बामणी येथे धाड टाकून दीड लाखाची दारू जप्त केली. या कारवाईत शुभम बहादुरे हा आपल्या घराजवळ दारू आणून त्याची विल्हेवाट लावत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे देशी दारुच्या दहा पेट्या व इतरसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

यात आरोपी शुभम बहादुरे,रा. बामणी व पारस निषाद, रा.बामणी यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास गायकवाड, रामीझ मुलाणी, पीएसआय चेतन टेंभुर्णे, आनंद परचाके, रणविजय ठाकूर, सुधाकर वरघने, शरद कुडे, दिलीप आदे, शेखर माथणकर यांनी केली.