राजीव गांधी स्मृर्ती प्रित्यर्थ कोरोना क्वारंटईन सेंटर,अँटीजन तपासणी केंद्र,उपजिल्हा रुग्णालयात

74

मॅक्स,सॅनिटायझर,हॅन्डक्लोज वाटप भारताचे पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या स्मृती दिनांनिमित्त मुल येथे कोरोना सनसर्गाच्या रोगाने पझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात आलेल्या नगर परिषदेच्या नवनिर्मित शाळेच्या

भव्य प्रशस्त इमारतीमध्ये असलेल्या संस्था विलगिकरन केंद्रात १०५ रुग्णांना मार्कस, सॅनिटायझर,व डॉकटर,नर्स,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना हेंडग्लोजचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना रुग्णांची अँटीजन तपासणी व आर.टी. पी.सी.आर.तपासणी केंद्र असलेल्या पत्रकार भवनाच्या इमारतीमध्ये सुद्धा डॉकटर,नर्स,कर्मचारी स्टाफ यांना मार्कस, सॅनिटायझर,हॅन्डक्लोज वाटप करण्यात आले.

 

तसेच उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पझिटिव्ह सेंटर मध्ये भरती असलेल्या रुग्णांना व त्यांची देखभाल ,तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी,आरोग्यकर्मचारी यांनी मार्कस, सॅनिटायझर बाटल्स, हॅन्डक्लोज चे वाटप करण्यात आले.हे साहित्य चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, संतोषशिंह रावत यांचे तर्फे पुरवठा करण्यात आला असून साहित्य वाटपाचे काम कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार,संचालक अखिल गांगरेड्डीवार,युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवर,उपसरपंच राहुल मुरकुटे,नगर सेवक विनोद कामडे, व कांग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.