लाभाचे कार्ड नसलेल्या गरीब कुटूंबाला धान्याचा लाभ द्यावा संतोषसिंह रावत यांची पंतप्रधान मोदी यांना विनंती

29

मूल : (प्रतिनिधी)
स्वस्त धान्य दुकानाद्वारे पुरविण्यांत येणारे धान्य समाजातील गरीब, दुर्बल व मागास आणि एपीएल कार्ड धारक कुटूंबालाही देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहु नये. त्याला दोन वेळचे अन्न मिळायलाच पाहीजे या उदात्त उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या योजने मधुन धान्य पुरवठा योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत सध्यास्थितीत राज्यातील स्वस्त धान्य दुकाना मधुन अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना तांदुळ, गहु आणि साखर पुरविल्या जात आहे. या योजने मूळे अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी समाधानी आहेत. हे जरी खरं असल तरी माञ एपीएल राशन कार्ड धारक माञ नाराज आहेत.

                                  देशातील लाखो एपीएल कार्ड धारक केंद्र शासनाच्या या योजने पासुन वंचित असल्याने या वर्गातील गरीब आणि मागास कुटूंब कोरोना काळात लागु केलेल्या लाँक डाऊन मूळे दोन वेळची भुक भागविण्यास असमर्थ ठरत आहेत. याशिवाय अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी ठरणाऱ्या लाखो कुटूंबाकडे स्वस्त धान्य दुकानाचे कार्ड नसल्याने ते ही कुटूंब केंद्र शासनाच्या धान्य पुरवठ्याच्या लाभापासुन वंचित आहेत, त्यांच्याही कुटूंबावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.                                           

                                    त्यामुळे उपासमारीच्या संकटात सापडलेल्या देशातील लाखो कुटूंबांना सध्यास्थितीत शासनाच्या मदतीची गरज आहे. करीता देशातील एपीएल राशन कार्ड धारकांशिवाय ज्यांचे कडे कोणत्याही लाभदायी योजनेचे कार्ड नाही. अश्या कुटूंबांना केंद्र शासनाच्या धान्य पुरवठा योजनेचा लाभ दिल्या जावा. अशी मागणी संतोषसिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असुन या गंभीर प्रकाराकडे राज्य शासनानेही लक्ष पुरवावे. अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही निवेदनाद्वारे केली आहे.