वाघाच्या हल्यात महिला ठार.

27

*

*तेंदूपत्ता संकलना करीता जाणे बेतले जीवावर.*

*सिंदेवाही*:- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने देशात व राज्यात लाकडाऊन करण्यात आले. त्यामुळे रोजगार नसल्याने सर्व मजुरांचे काम बंद झाले होते. आणि मजुरावर व त्यांच्या कुटुंबातील सर्व येक्तीवर उपासमारीची वेळ आली. अश्या परिस्थितीत तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्याने या परिसरातील मजुरांनी तेंदू शपत्ता संकलन करून उपासमारीचा प्रश्न सोडविला आहे. सद्या तेंदूचा हंगाम असून तेंदू संकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक रोजगार परिसरातील जंगल भागात महिला, पुरुष जात आहे.

तेंदूपत्ता संकलनाकरीता आज सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी(कोके.) येथील दिवान तलाव परिसरात महिला गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करून ठार केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. मृतक महिलेच नाव सीताबाई गुलाब चौके (वय ५५) कोकेवाडा पेंढरी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व पोलिस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.