फुटपाथ व्यवसाईकांना महागाईचा बसतोय फटका

24

मूल :— फुटपाथ व्यवसायीकांना संचारबंदीच्या फटका बसत असून कर्जही मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरवाढीचे बाजारपेठेवर महागाईचे सावट दिसत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आर्थीक टंचाईचा सामना करावा लागत आहे.आठवडाभरात खाद्यतेल थेट दोन हजार पन्नास रूपये  प्रति डब्बा असा दर झाला आहे.

 

तर घरगुती गॅंस सिलिंडर 860 रूपयांपर्यंत पोहोचले आहे.

 

 

 

विविध वस्तूंचे दर दर

 

 

रोज वाढत असताना इंधन दराकडे बोट दाखविले जाते.ग्राहकांना याचा चटका सहन करावा लागत आहे. फुटपाथ वरील लघुउद्योगांनाही महागाईचा सामना करीत व्यवसाय सांभाळावा लागत आहे. छोटे व्यापारी व ग्राहक यांच्यात दरवाढीवरून वाद—विवाद सुरू आहेत. ग्राहक व्यापा—याला दोष देतो. व्यापारी शासनाला दोष देऊन महागाईविरोधात रोष व्यक्त करीत आहेत.

इंधन दरवाढ हे निश्चित चिंताजनक आहे.महागाईच्या दृष्टचक्रात गोरगरीब अधिकच भरडला जातो.आवक कमी व खर्च अधिक असल्याने कुटुंब चालकाला आर्थिक गाडा हाकलण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागत आहे.प्रशासनही मदत करत नसल्याने अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.फुटपाथ व्यवसाईकांना महागाईत मदतीची मागणी होत आहे.