ग्रामीण डाक सेवक पद भरती, दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी मोठी संधी

44

पोस्ट विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक भरती सुरु होणार आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसेसमध्ये ब्रँच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)/ ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण २,४२८ पदांची भरती सुरु आहे. (अजा-१९१, अज-२४४, इमाव-५६५, इडब्ल्यूएस-२४६, दिव्यांग(ए)- १०, दिव्यांग(बी)- २३, दिव्यांग (सी)-२९, दिव्यांग (डी ई)-१५, खुला-११०५)

पदनिहाय काम :          Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021

  1. ब्रँच पोस्टमास्टर :
    ग्रामीण डाक सेवक ब्रँच पोस्ट ऑफिसचं काम सांभाळणं. इंडिया पोस्ट्स पेमेंट्स बँकेचं (IPPB) काम सांभाळणं. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील/ ग्रामपंचायतीमधील पोस्टाचा व्यवसाय सांभाळणं. ब्रँच पोस्ट मास्टर हा ग्रामीण डाक सेवक ब्रँच ऑफिसचा प्रमुख असेल.
  2. असिस्टंट ब्रँच मास्टर :
    स्टॅम्प/स्टेशनरी यांची विक्री, एकूण टपालाची वाहतूक व वितरण, IPPBच्या कामात व पोस्टाच्या इतर कामात ब्रँच पोस्ट मास्टरना मदत करणं.
  3. ग्रामीण डाक सेवक :
    स्टॅम्प/स्टेशनरी यांची विक्री, एकूण टपालाची वाहतूक व वितरण व्यवस्था सांभाळणे. ब्रँच पोस्ट मास्टर/असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर्सनी दिलेली इंडिया पोस्ट पेमेंट बँक व इतर पोस्टाची कामं करणं.

पात्रता :  Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021

  1. सर्व पदांसाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक. इयत्ता दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अधिक गुणवान समजण्यात येईल (एकापेक्षा अधिक प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्यांपेक्षा).
  2. दहावीला गणित, स्थानिय भाषा आणि इंग्रजी विषय अभ्यासलेले असावेत.
  3. पोस्टल सर्कलसाठी नेमलेली ऑफिशियल लँग्वेज उमेदवारांना अवगत असणं आवश्यक. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील उमेदवारांसाठी ऑफिशियल लँग्वेज ही मराठी आहे. कर्नाटकसाठी कन्नड, गोव्यासाठी कोंकणी/मराठी, मध्य प्रदेशसाठी हिंदी, गुजरातसाठी गुजराती.
  4. उमेदवारांनी किमान ६० दिवस कालावधीचा बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला असावा.
  5. उमेदवारांना सायकल चालवता येणं बंधनकारक आहे. सायकल ऐवजी स्कूटर/मोटर सायकल चालवता येत असेल तरी चालेल.

उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना कोणतंही प्राधान्य देण्यात येणार नाही. ब्रँच पोस्ट मास्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपल्या कार्यक्षेत्रात ब्रँच पोस्ट ऑफिससाठी निवड झाल्यानंतर व कामास सुरूवात करण्यापूर्वी जागा मिळवून द्यावी लागेल. उमेदवार एका वेळेला सर्कलमधील २० पदांसाठी एकच ऑनलाइन अर्ज करू शकतील, त्या प्रत्येक पदासाठी पसंतीक्रम देणं आवश्यक आहे. विभागानुसार रिक्त पदांचा तपशील वेबसाइटवर उपलब्ध आहे.

वयोमर्यादा :

१८ ते ४० वर्षं (इमाव- ४३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ४५ वर्षांपर्यंत, विकलांग उमेदवार- खुला गट- ५० वर्षांपर्यंत, इमाव- ५३ वर्षांपर्यंत, अजा/अज-५५ वर्षांपर्यंत). EWS उमेदवारांना वयात कोणतीही सूट नाही याची नोंद घ्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपलं नाव http://appost.in/gdsonline या वेबसाइटवर २६ मे २०२१ पर्यंत रजिस्टर करायचं आहे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे.

Total: 2428 जागा

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2428

2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 GDS-डाक सेवक
Total 2428

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online