विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी : महापोर्टलच्या परीक्षा MPSC मार्फत घेण्यास आयोगाची सहमती

37

वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रमाणामुळे राज्यातील अनेक परीक्षा यापुढे ढकलण्यात आल्या. परिणामी अनेक भरती प्रक्रियेतील परीक्षा या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाहीत. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता महापोर्टलच्या परीक्षा या एमपीएससी मार्फत घेण्यास एमपीएससी आयोगाने सहमती दर्शविली आहे.

एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्यास याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. मात्र, आता राज्य सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील कंत्राटी पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या भरतीच्या प्रक्रियेतील परीक्षा यामध्ये भोंगळ कारभार केला जात होता. म्हणून महापोर्टलच्या परीक्षा एमपीएससी आयोगामार्फत घेण्यात याव्यात, अशी राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात आलेली होती. त्यानुसार गेल्या सहा महिन्यापूर्वी राज्य सरकारने एमपीएससी आयोगाला पत्र लिहले होते.

आयोगाला लिहलेल्या पत्र म्हंटल होत कि, कंत्राटी पद्धतीच्या परीक्षा या एमपीएससी आयोगामार्फत घेतल्या जाव्यात. जेणेकरून सर्व परीक्षांत पारदर्शकपणा येईल. त्यानंतर आता एमपीएससी आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहले असून परीक्षा घेण्यास सहमती दर्शवलेली आहे. याचा मोठा फायदा हा आता विद्यार्थ्यांना होणार आहे.

राज्य शासनाने लवकर निर्णय घेतल्यास राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना एमपीएससीमार्फत परीक्षा देता येणार आहेत. वास्तविक, पाहता राज्यात ज्या नोकरभरतीच्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये पारदर्शकपणा यावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सर्व परीक्षा या एमपीएससी मार्फतच घेतल्या जाव्यात यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आता एमपीएससी आयोगाने राज्य सरकारला सहमती दर्शविली आहे.