Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या

40

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे २०२१ रोजी पार पडणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात विविध प्रवेश परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात येत असताना ही परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण विद्यर्थी पालकांमध्ये होतं. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

“कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३ मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.