ऑक्सिजन काॅन्स्ट्रेटर मिळवून दिल्याबद्दल नगराध्यक्ष यांनी मानले आभार

40

मूल :— केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सहकार्याने मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नातून मूल तालुक्यासाठी दहा ऑक्सिजन काॅन्स्ट्रेटर मिळवून दिले. ऑक्सिजन सिलेंडरच्या तूलनेत सदरील मशीनमूळे ऑक्सिजन ची कमतरता भरून निघणार आहे मशीनच्या क्षमतेनुसार हवेतील प्राणवायू 10 लिटरप्रमाणे मशीनमध्ये साठवली जाणार.

सदरील ऑक्सिजन कोरोना बाधिताला आवश्यकतेनुसार दिल्या जाईल ऑक्सिजन संपले की परत ती मशीन ऑक्सिजन हवेतून साठवेल.अशाप्रकारे ऑक्सिजन ची कमतरता ही मशीन दूर करेल त्यामूळे कोरोना पेंशटला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा पाहता ऑक्सिजन काॅन्स्ट्रेटर कोरोना बाधितांसाठी जीवनदायिनी ठरणार आहे.

त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष श्री.प्रभाकर भोयर व नगराध्यक्ष प्रा.रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष सर्व नगरसेवक ,भाजपा कार्यकर्ते यांनी  मा.सूधीरभाऊंचे आभार मानले.