जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते कर्करोग पीडित लाभार्थ्याला धनादेश वाटप

28

चंद्रपुर : ०४ मे २०२१, मंगळवार…..

जिल्हा परिषद निधीतून हृदयरोग, कर्करोग व किडनी निकामी होणे अश्या दुर्धर आजराने पीडित रुग्णांना आर्थिक मदत योजने अंतर्गत कर्करोग पिडीत पारस जगदीश खोब्रागडे, राजोली ता. मूल वय १५ वर्षे यांना जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते १५००० (पंधरा हजार) रुपये चा धनादेश वितरित करण्यात आला.
यावेळी श्री. अतुल येरने कनिष्ठ सहायक आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपुर उपस्थित होते.