पंतप्रधान आवास योजनेला निधीचा खोडा हप्ताअभावी अनेकांच्या घरांची कामे थांबली

25

मूल (प्रमोद मशाखेत्री ):- कोरोनाने आर्थिक संकट ओढवले. अनेकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली. अशाही परिस्थितीत गाठीशी असलेलापैसा खर्च करून घराची कामे पूर्ण केली. काहींची कामे अर्धवट राहिली,तर काहींनी उसणवारी करून घरे बांधली. आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळेल,अशी लाभार्थीना अपेक्षा होती.मात्र वर्ष निघून गेले तरी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निधी मिळालेला नाही.

‘सर्वासाठी घरे ‘ या संकल्पनेतून देशभर पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. मात्र वर्ष झाले तरी घरकुलाचा हप्ता मिळाला नसल्यानेकर्ज काढून घरकुल बांधणा-यांपुढे आता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शासनाकडून घरकुल मंजुर झाल्यानंतर तालुक्यातील,मुल शहरातीलअनेकांनी जीर्ण घरे पाडून आवास योजनेअंतर्गत नवीन घरे बांधायला सुरूवात केली.

काहींनी भाडेतत्वावर राहून घरकुलाच्या कामाला सुरूवातकेली.उसनवारीने पैसे घेऊन बांधकाम पूर्णत्वास नेले,मात्र योजनेचे हप्ते मिळाले नसल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले आहे.एकीकडे घर बांधकामाची चिंता आणि दुसरीकडे घरभाडयाचा भार यामुळे लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

‘‘ मागील 4 महिन्यापासून आवास योजनेचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.जुने घर पाडून उसनवारी पैसे घेत नवीन घराचे बांधकाम केले.आता कोरोनाने रोजगारही गेला. घर बांधकम चा जोता झाल्याने पहिला हप्ताचा तातडीने निधी द्यावा– एक घरकुल लाभार्थी  जुनी वस्ती विश्रामगृह रोड,मूल

सहा टप्प्यात मिळतोय निधी:- योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासन असे मिळून 2 लाख 50 हजार रूपये लाभार्थीना देतात.
त्यामध्ये

राज्य शासनाकडून मिळणा-या 1 लाख रूपयातून पहिल्या टप्यात 40 टक्के,दुस-या टप्यात 40 टक्के,तर तिस-या टप्यात 20 टक्केरक्कम दिली जाते.

केंद्र शासनाकडून मिळणा-या दीड लाखातून पहिल्या टप्यात 60 टक्के ,दुस-या व तिस-या टप्यात 20टक्के निधी दिला
जातेा. अशा एकूण 6 टप्यात लाभार्थीना निधी वितरित केला जातो.