मूल च्या नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर यांनी 3 महिन्याचं मानधन दिले कोरोना बाधितांच्या सुविधांसाठी

35

मुल:राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर कोरानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व शासनाला पडणारा आर्थिक बोझा बघता ‘फूल ना फुलाची पाकळी’ . या उदात्त भावनेने कोराना महामारीच्या गंभीर परिस्थितीत आपलाही मदतीचा हात आपल्या समाजातील लोकांसाठी असावा या सामाजिक भावनेतून नगर परिषद मूल च्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर यांनी त्यांना मिळणारे तीन महिन्याचे मानधन 45000 रू. कोरोना बाधितांच्या सुविधांसाठी  शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.

‘ राज्यात कोरोनाचे संकट तीव्र होत आहे. कोरोनाचा प्रसार मोठया प्रमाणात गावखेड्या पर्यंत पोहोचला आहे .गेल्या काही दिवसांपासून आॅक्सिजन,बेड,व्हेंटिलेटर,रेमिडीसिवीर,आॅक्सीजनची टंचाई निर्माण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सुविधा मिळणे दुरापास्त झाले होते.मुल तालुक्यात वाढत चाललेेली रूग्ण संख्या चिंताजनक आहे. प्रशासन कोरोना रूग्णांना तातडीने उपचार व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहे. नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी नागरिकांना आवाहन करतांना म्हणाल्या की ‘‘ कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सुध्दा काटेकेारपणे कोरोनाचे व संचारबंदीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे व स्वस्थ जीवन जगावे असे आवाहन केले आहे.