मूल उपजिल्हा रूग्णालयात 50 आॅक्सिजन बेडला मंजुरी सुधीर मुनगंटीवार यांची माहिती: दोनच दिवसात मागणी पूर्ण

40

उप जिल्‍हा रूग्‍णालय मुल येथे 50 ऑक्‍सीजन बेडसला मंजुरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी दोनच दिवसात मागणी पुर्ण

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल येथे 50 ऑक्‍सीजन बेडसला मंजुरी देण्‍यात आली आहे. जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी दिनांक २९ एप्रील 2021 रोजीच्‍या आदेशान्‍वये मुल येथे 50 ऑक्‍सीजन बेडसला प्रशासकीय मान्‍यता दिली आहे.

दिनांक 27 एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मुल येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली होती. त्‍यावेळी मुल शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्‍या सोयीच्‍या द़ष्‍टीने 50 ऑक्‍सीजन बेडसला प्रशासकीय मान्‍यता देण्‍याची मागणी केली होती. त्‍याद़ष्‍टीने स्‍थानिक यंत्रणांना जिल्‍हाधिका-यांकडे प्रस्‍ताव पाठविण्‍याच्‍या सुचना सुध्‍दा त्‍यांनी दिल्‍या होत्‍या. जिल्‍हाधिका-यांशी चर्चा करून आ. मुनगंटीवार यांनी दोनच दिवसात ही मागणी पुर्णत्‍वास आणली आहे.

मुल येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयात 50 ऑक्‍सीजन बेडससाठी 50 लक्ष रू खर्चाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. येत्‍या 4 ते 5 दिवसात हे ऑक्‍सीजन बेडस उपजिल्‍हा रूग्‍णालयातील रूग्‍णांच्‍या सेवेत रूजु होतील.