Corona Vaccine: १८ वर्षांवरील लसीकरणाच्या नोंदणीचं ‘सर्वर’ काही मिनिटांतच ‘डाऊन’

34

मुंबई – करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, राज्यात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचललं आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी असलेलं कोविन सर्वर तासाभरातच डाऊन झालं आहे.

१८ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी कोविन ऍप, उमंग ऍप आणि आरोग्य सेतूवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. आज संध्याकाळी ४ वाजेपासून या वेबसाईटवर रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली. पण अवघ्या काही मिनिटांतच वेबसाईट आणि ऍप क्रॅश झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं अनेकांची पंचाईत झाली आहे.

दरम्यान राज्यातील लसीकरण १ मे पासून सुरू करता येणार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे. मात्र त्याच्या नोंदणीसाठी सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी नोंदणी करूनच लस घेण्यासाठी जावं. थेट केंद्रावर गेल्यास लसीकरण होणार नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आता सर्वरच डाऊन असल्याने दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.