मूल तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये लसीकरण जनजागृती साठी ऑटो सज्ज

40

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मूल तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये लसीकरण जनजागृती साठी ऑटो सज्ज-जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी दाखविली हिरवी झेंडी

मूल : २८ एप्रिल २०२१, बुधवार….

आज जगामध्ये कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये कोविड-19 चे अनेक रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असून दररोज १२०० ते १५०० रुग्ण आढळून येत आहेत. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते ग्राम पंचायत पर्यंत सर्वांनी या महामारीला थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

याच माध्यमातून मूल पंचायत समितीच्या वतीने ग्रामीण भागामध्ये कोरोना चा प्रसार थांबविण्यासाठी लसीकरण जनजागृती साठी ऑटो करून त्यावर बॅनर लावण्यात आले आहे. या जनजागृती साठी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी हिरवी झेंडी दाखवून कोरोना वाढता उद्रेक थांबविण्यासाठी सर्वांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

कोरोना या महामारीने सर्वांना घाबरून सोडले आहे. दररोज वेगवेगळे आकडे बघायला मिळत आहे त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणीही कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क, सॅनिटाईजर आणि सामाजिक अंतर या त्रिसुत्री चे पालन करावे, आपल्याला कोरोणाचे चे लक्षण आढळून आल्यास कोणीही घाबरून न जाता दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी व सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित माजी पंचायत सभापती सौ. पुजा डोहणे, सौ. वर्षा लोनबले सदस्या, श्री कळसे गट विकास अधिकारी पंचायत समिती, श्री. प्रधान विस्तार अधिकारी पंचायत समिती,श्री. जिदगीलवर आरोग्य विस्तार अधिकारी, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.