बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार

41

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. सध्याची परिस्थिती पाहता बारावी परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल 8 हजार 250 रुपये इतके परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील तसेच खासगी विद्यार्थ्यांना अतिविशेष, अतिविलंब परीक्षा शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 22 एप्रिल रोजी संपली आहे. त्यामुळे 23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष, अतिविलंब शुल्कासह परीक्षाअर्ज भरता येणार आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा अर्ज भरण्याची ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.