अफवांवर विश्वास ठेवू नका, लसीकरण करा, कोरोनाचा धोका टाळा.श्री .दुर्वास कडस्कर उपसरपंच ग्रा. प.चिखली

46

मूल:- तालुक्यातील चिखली येथे २७/४/२०२१  मंगळवार ला कोविड लसिकरणाचे सत्र जी. प . शाळा चिखली त.मुल जी.चंद्रपूर या ठिकाणी सुरु आहे.गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रासह जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट आल्याने या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी असे अनेक उपाय करण्यात आले. मात्र, कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने डोके वर काढल्याने शासनाने कोरोना योद्ध्यांना लस दिल्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व आजार असलेले, नसलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सुरू केले.लसिकरणास येतांना सोबत आधारकार्ड व काहीतरी खाऊन यावे. उपाशीपोटी येवू नये.
कोरोना प्रादुर्भाव टाळण्याचे दृष्टिने स्वतः चे पिण्याचे पाणी स्वतः आणावे.   मास्क व सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक.
सर्दी, खोकला, ताप, चव व गंध न समजणे, दम लागणे वैगेरे लक्षण असल्यास प्रथम अँटिजन टेस्ट करुन घ्यावी. व नोंदणी करतांना सदर बाब निदर्शनास आणावी.तपासणी केंद्रातील डॉक्टर यांच्या प्राधान्याने सदर बाब लक्षात आणावी.अफवांवर विश्वास ठेवू नका, लसीकरण करा, कोरोनाचा धोका टाळा.असे आवाहन गावातील तसेच परीसरातील नागरीकांना दुर्वास कडस्कर उपसरपंच यांनी केले आहे.

चिखली येथे कोविड १९ लसीकरण केंद्रात लसीकरनाला उपस्थित श्री दुर्वास कडस्कर उपसरपंच चिखली ग्राम.पंचायत सदस्य राकेश जोलंमवार ,आरोग्य सहायक बोरकुटे राजोली,मेश्राम सिस्टर,आरोग्यसेवक मस्के चिखली, मुत्यालवार सिस्टर चिखली , आश्या वर्कर,ग्राम पंचायत शिपाई ,आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.