१८ वर्षावरील व्यक्तीला कोविड लस, कसे कराल रजिस्टर आणि अपॉइंटमेंट, जाणून घ्या

37

१ मे २०२१ पासून देशातील वयाची १८ वर्ष पूर्ण करणारी तसेच १८ वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक हे कोविड लस घेण्यासाठी पात्र असतील, अशी घोषणा नुकतीच केंद्रातील मोदी सरकारने केली आहे. लस कुठे आणि कशी उपलब्ध होणार जाणून घ्या डिटेल्स. तसेच येत्या १ मे पासून देशात १८ वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना कोविड १९ लस दिली जाणार आहे. यासाठी काय प्रोसेस आहे. कसे रजिस्टर करायचे, जाणून घ्या.करोना लस साठी रजिस्टर करण्याची पद्धत आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत. सोबत तुमची अपॉइंटमेंट कशी बुक करू शकता आणि लस सर्टिफिकेशन कसे डाउनलोड करू शकता, याची माहिती देत आहोत.

कोविड १९ लससाठी असे करा रजिस्ट्रेशन

१. सर्वात आधी तुम्हाला www.cowin.gov.in वर जावे लागेल. यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. याला एन्टर करून व्हेरिफाय बटनवर क्लिक करा.

२. या वेबसाइटवर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला Registration of Vaccination वर आणले जाईल. या ठिकाणी तुम्हाला फोटो आयडी टाइप, फोटो आयडी प्रूफ नंबर, नाव, जन्म दिनांक, जेंडल आणि अन्य डिटेल्स भरावे लागणार आहे. यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करावे लागेल. तुम्हाला एसएमएस द्वार सर्व आवश्यक डिटेल्स पाठवले जातील. सर्व डिटेल्स तपासून घ्या. या ठिकाणी तुम्हाला Beneficiary Reference ID दिला जाईल. याला सेव करुन ठेवा.

३. तुम्ही या अकाउंटला ३ लोकांसोबत लिंक शेयर करू शकता. यासाठी तुम्हाला उकाउंट डिटेल्स पेजच्या खाली दिलेल्या अॅड मोअर बटनवर क्लिक करावे लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही डिटेल्स भरली होती. तितकीच तुम्हाला डिटेल्स एन्टर करावी लागेल.

४. आपल्या जवळच्या सेंटरला शोधण्यासाठी तुम्हाला www.cowin.gov.in वर जाऊन खाली बाजूस स्क्रॉल करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला मॅप आणि डायलॉग बॉक्स दिसेल. त्यात तुम्हाला एन्टर प्लेस, अॅड्रेस, लोकेशन इत्यादी डिटेल्स एन्टर करावे लागतील त्यानंतर गो बटनवर टॅप करावे लागेल.

५. अपॉइंटमेंट स्केड्यूल करण्यासाठी तुम्हाला अकाउंट डिटेल पेजवर जावे लागेल. यानंतर कॅलेंडर आयकॉन वर जावे लागेल. त्यानंतर स्केड्यूल अपॉइंटमेंट बटनवर क्लिक करू शकता. असे केल्यानंतर तुम्हाला वॅक्सिनेशन पेजवर बुक अपॉइंटमेंट वर पोहोचवले जाईल. या पेजवर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वॅक्सिनेशन सेंटरचा पर्याय निवडू शकता.

६. ज्यावेळी तुम्ही सेंटरचा पर्याय करता. त्यावेळी तुम्हाला स्लॉट दिसेल. यानुसार, स्लॉट निवडा. यानंतर बुक बटनवर क्लिक करा. यानंतर Appointment Confirmation पेज ओपन होईल. सर्व डिटेल्सला चांगल्या प्रकारे चेक करून कन्फर्म बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्या ठरल्या वेळेला लस घ्या.

७. कोविड १९ लस सर्टिफिकेटला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला cowin.gov.in वर जावे लागेल. याशिवाय, Aarogya Setu अॅपवर सुद्धा जाऊ शकता. आरोग्य सेतू अॅपवर गेल्यानंतर कोविन टॅप वर जावे लागेल. यानंतर Vaccination Certificate पर्यायावर जावे लागेल. यानंतर Beneficiary Reference ID टाकावे लागेल नंतर Get Certificate बटनवर क्लिक करावे लागेल. या सर्टिफेकट मध्ये नाव, जन्म दिनांक, बेनिफिशियरी रेफरेंन्स आयडी, फोटो ओळखपत्र, लसीचे नाव, हॉस्पिटलचे नाव हे सर्व उपलब्ध असेल.

८. CoWin वेबसाइट वरून सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला https://selfregistration.cowin.gov.in/vaccination-certificate वर जावे लागेल. त्यानंतर Beneficiary Reference ID टाकावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा सर्च बटनवर टॅप करून सर्टिफिकेट डाउनलोड करावे लागेल.