अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू

49
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू
चंद्रपूर दि. 25 एप्रिल: सर्व किराणा दुकाने, भाजी दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची धान्य दुकाने, (अंडी, मटण, चिकन, मासे व poultry), कृषी संबंधित सर्व सेवा/ दुकाने, पशुखाद्य दुकाने, पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याचे उत्पादन करणारी वैयक्तिक तसेच युनिट (कंपनी) या सेवा सकाळी 7:00 ते सकाळी 11:00 वाजेपर्यंत सुरू राहतील.
तथापि, वरील प्रमाणे दुकाने / आस्थापना द्वारा घरपोच सेवा सकाळी 7:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत सुरू राहतील. असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेले आहे