BIG NEWS | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात सर्वांना मोफत लसीकरण

67

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण मोफत होणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी केली आहे.

 

 

दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लशीचे दर जाहीर केले आहेत. 1 मेपासून देशामध्ये 18 वर्षांवरील सगळ्यांना कोव्हिड-19साठीची लस घेता येणार आहे. त्यासाठी 1 मे पूर्वी लशीचे दर जाहीर करावेत, असं सरकारने लस उत्पादक कंपन्यांना सांगितलं होतं. त्यानुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांच्या ‘कोव्हिशील्ड’ लशीचे दर जाहीर केले आहेत.

त्यानुसार, सरकारी दवाखाने आणि लसीकरण केंद्रांसाठी कोव्हिशील्डचा प्रत्येक डोस 400 रुपयांना मिळेल, तर खासगी दवाखान्यांना कोव्हिशील्डचा प्रत्येक डोस 600 रुपयांना विकत घेता येईल. अशी माहिती देण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने हे लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.