राज्यात ई- पास मिळवण्यासाठी नेमके काय करावे लागणार ?

77

मुंबई – राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले उचण्यास सुरुवात असून ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध अजूनच कठोर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हांतर्गत प्रवासावरील निर्बंधही अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा ई-पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.

आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना अत्यावश्यक कारणांसाठी या ई-पासची आवश्यकता भासणार आहे. नागरिकांना काही महत्त्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई-पास काढावा लागणार आहे.

 

राज्यात गुरुवारी रात्रीपासून प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाहसोहळ्यांवर अनेक निर्बंध आले आहेत. हे नियम 1 मे पर्यंतच लागू असणार आहेत. त्यामुळे यादरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई-पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.