केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी सुरु राहतील : अनिल परब

37

वृत्तसंस्था मुंबई    :- राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे जिल्हा बाहेरील प्रवासावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. अशात रेल्वे व मेट्रोतुन अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याने एसटीबाबत कोणता निर्णय राज्य सरकार घेईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एसटी बसच्याबाबत परिवहनमंत्री डॉ. अनिल परब यांनी आज नियमावली जारी केली. केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच एसटी सुरु राहतील, अशी माहिती परब यांनी दिली.

परिवहनमंत्री डॉ. अनिल परब यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, एस.टी अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु ठेवली जाणार आहे. तसेच खाजगी वाहतूक, बेस्ट आणि एसटी कर्मचा-यांची सुरक्षा याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज मंत्रालयात ४.३० वाजता महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. रेडझोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर भागात तब्बल दोन महिन्यांनंतर उद्या शुक्रवारपासून जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरू होत आहे.राज्य शासनाने रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता काही अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्हा-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गांवर उद्यापासून एसटी बससेवा सुरू केली जात आहे. या बससेवेसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहनही अनिल परब यांनी केले आहे.