एकीकडे कोरोनाचा कहर,तर दुसरीकडे पोटाचा प्रश्न ?

32

पहिल्या लाटेत भरघोस मदत दुस-या लाटेत मदत करणारेच गायब

एकीकडे कोरोनाचा कहर,तर दुसरीकडे पोटाचा प्रश्न ?  भेडसावत आहे.

मूल:- मागील वर्षी कोरोनामुळे सरकारने लाॅकडाऊन घोषित केल्यानंतर लोकांना खायला काही नाही म्हणून केंद्र शासनापासून तर गावातील ग्रामपंचायतीने देखील फूल नव्हे,तर फुलाची पाकळी म्हणून मदत केली.सामाजिक संघटना,कार्यकर्ते व समाजातील धनाढया व्यक्तीनी गोरगरिबांना ,गरजुंना,विधवा परित्यक्ता यांनाअन्नधान्य,तेल,तिखट,मीठ,तंादूळ,गव्हाचे पीठ,सोयाबीन वळी,चना डाळ,तूरडाळ,हरभरा अशा विविध वस्तू गोरगरिबांनावाटप केल्या जणू हे वाटप करण्याची पैजच लागली असवी असे चित्र होते.

मागच्या वर्षी लाॅकडाऊन सुरू झाले तेव्हा गोरगरिबांनी पैसे कमविले तेव्हा त्यांच्याजवळ पैसेही होते तरीही त्यांना मदत करण्यात आली. परंतु यंदा कोरोनामुळे कुणाकडे पैसे नसताना गोरगरिबांना या कोरोनाचा संकटाचा सामनाकरताना पोटाचा प्रश्न आड येत आहे.अशात महाराष्ट्र सरकारने तुटपंुजी मदत करण्याची घोषणा केली, परंतु ही मदत तोकडया लोकांनाच मिळणार आहे.उर्वरित गोरगरिबांच्या मदतीसाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. गोरगरिबांच्या मदतीसाठी आता दोन वेळच्याजेवणाची समस्या भेडसावत आहे. एकीकडे कोरोनाचा कहर,तर दुसरीकडे पोटाचा प्रश्न भेडसावत आहे.

मागच्या वर्षीच्या लाॅकडाउुनमध्ये गोरगरिबांना मदत करून फोटो प्रकाशित करणा-यांनी यंदा का मदतीसाठी हात पुढे केला नाही.मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य आताही त्यांच्याकडून संपले नसावेत असा तर धान्य देणारे विचार करीत नाही ना, असा सवाल  उपस्थित होत आहे.