मूल तालुक्यात आज सापडले ३३ कोरोना बाधीत

41

मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यात आज अँटीजन तपासणीत १६ आणि आरटीपीसीआर तपासणीमध्ये १७ असे एकुण ३३ कोरोना बाधीत सापडले. तालुक्यात आज १४१ जणांनी आरटीपीसीआर तर ४४ जणांनी अँटीजन असे एकुण १८५ जणांनी आज तपासणी केली. आजपर्यंत तालुक्यात १४७५१ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या २७३ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी १५५ जण गृह अलगीकरणात तर ११८ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंञी ना. विजय वडेट्टीवार यांनी आज उप जिल्हा रूग्णालयात मूल तालुक्याचा कोरोना संदर्भातील कार्याचा आढावा घेवुन उपाय योजना संबंधी आश्वस्थ केले.