राईस मील असोशिएशन ” यांचेकडून 50 बेड सेवेत

35

राईस मील असोशिएशन ” यांचेकडून 50 बेड सेवेत

मूल :

जिल्ह्यात कोरोना रूग्णात सतत वाढ होत असल्याने मूलची पॉझिटिव्ह संख्या लक्षात घेता मूल येथिल राईस मिल असोसिएशन कडुन शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने बेडची गरज लक्षात घेता 50 बेडची सोय मूलच्या प्रशासनाला देण्याचे ठरविले आहे. अद्यावत नविन 50 बेड येत्या दोन दिवसात देण्यात येणार आहे. शहरातील ईतरही असोसिएशनने आपल्या शहरासाठी असेच सहकार्य करण्याचे आवाहनही राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष हिरेन गोगरी, सचिव  जिवन कोंतमवार यांनी  सांगितले.  

कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून हा प्रादुर्भाव किती काळ चाालणाार आहे याबाबत कोणीही सांगु शकत नाही. चंद्रपुर जिल्ह्यात मृत्युचे प्रमाण वाढु लागत आहे. संपुर्ण दवाखाने हाऊस फुल असल्याने रूग्णाला बेेड मिळत नसल्याने दवाखाण्याच्या दारावरच जिव गमवावा लागत आहे.  बेडची अत्यंत गरत लक्षात घेता सामाजिक दायित्व जोपासत मूलच्या राईस मिल असोसिएशनने  नागरीकांसाठी 50 बेडची सोय करणार असुन ते दोन दिवसात सेवत येणार असल्याने मूलच्या नागरीकांनी राईस मिल असोसिएशनचे आभार मानत या सामाजिक कामाचे कौतुक करीत आहेत.