नागरिकांनो,आता विनाकारण घराबाहेर पडणे टाळाच ! मूल तहसीलदारांचे आवाहन डाॅ.रविन्द्र होळी

40

नागरिकांनो,आता विनाकारण घराबाहेर पडणे टाळाच ! डाॅ.रविन्द्र होळी
तहसीलदारांचे आवाहन: दुस-या लाटेतुन बाहेर पडण्यासाठी सहकार्य करा

मूल:- कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने लाॅकडाऊनची अंमलबजावणी केली. या काळात नागरिकांनी
घराबाहेर पडू नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डाॅ.रविन्द्र होळी यांनी केले.
कोरोना उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदारांनी स्वत:रस्तावर उतरून सर्व तलाठी,
मंडळ अधिकारी यांना सोबत घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे तालुक्यातील परिस्थिती
नियंत्रणात आहे. मूल येथील स्वामी विवेकानंद 150 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तपासणीनंतर रूग्णांवर करण्यात येणा-या उपचाराची दखलघेतली जात आहे.वैद्यकिय अधिकारी,कर्मचारी कोरोनाच्या उपाय योजनांच्या नियोजनामध्ये व्यस्त आहे.
दररोज चाचण्या केल्या जात आहे.शासनाने लाॅकडाऊन लावल्यामुळे बाजारपेठेतील सर्वच दुकाने आता बंद बंद आहे. नागरिकांनी प्रशासनालासहकार्य करावे.विनाकारण घराबाहेर फिरू नये,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग गावखेडयात शिरल्यामुळे प्रत्येक गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिक पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांची वैद्यकिय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हेाम क्वारंटाईन आल्यानंतर कुटुंबीयांनी काळजी घ्यावी. बाधित रूग्णांपासून दूर राहावे. मास्कचा वापर करावा,असे आवाहनकरण्यात आले आहे.
आपली बिफिकिरी कुटुंबाला धोक्यात आणू शकते. जीवन अनमोल आहे,ते एकदाच मिळते. त्यामुळे
बिनधास्त राहणे सोडा,कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा, असे ही आवाहन डाॅ.रविन्द्र होळी केले
आहे.