मूल तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा वाढला

37

मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधीतांचा आकडा भितीदायक वाढला आहे. अँटीजन तपासणीत १८ तर आरटीपीसीआर तपासणीमध्ये ३० असे एकुण ४८ कोरोनाबाधीत सापडल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. सावली तालुक्यात माञ आरटीपीसीआर तपासणीत एकही बाधीत आढळला नसुन अँटीजन तपासणीत ०७ जण बाधीत आढळले आहे. मूल आणि सावली तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लस संपल्याने लसिकरण बंद आहे. मूल येथील कोरोना चाचणी केंद्रावर १५९ जणांनी आरटीपीसीआर तर ६५ जणांनी अँटीजन असे २२४ जणांनी तपासणी केली असुन मूल तालुक्यात आजपर्यंत १४०६८ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या १८४ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी १०९ जण गृह अलगीकरणात तर ७५ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. सावली येथे आज ३८ जणांनी आरटीपीसीआर तर ७४ जणांनी अँटीजन असे ११२ जणांनी कोरोना तपासणी केली. सावली तालुक्यात आजपर्यंत १०६७९ जणांनी तपासणी केली असुन सावली तालुक्यात कोरोनाच्या १४६ अँक्टीव्ह रूग्णांपैकी ६९ जण गृह अलगीकरणात तर ७७ जण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. मूल तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा दुप्पटीने वाढल्याने प्रशासन सतर्क झाले असुन बाधीतांचा आकडा पुन्हा वाढल्यास येत्या सोमवार पासुन स्थानिक प्रशासनाला ब्रेक द चैन मधील काही निर्णयाची कडक अंमलबजावणी करावी लागले. अशी शक्यता वर्तविल्या जात आहे.