मूल नगर परीषदे अंतर्गत नव्याने बांधलेल्या प्रशस्त ईमारतीत कोविड सेंटरला प्रारंभ, दिडशे बेडची सोय

42

मूल नगर परीषदे अंतर्गत नव्याने बांधलेल्या प्रशस्त ईमारतीत कोविड सेंटरला प्रारंभ,
दिडशे बेडची सोय
मूल :जिल्ह्यात कोरोना रूग्णात सतत वाढ होत असल्याने मूलची पॉझिटिव्ह संख्या लक्षात घेता प्रशासन नागरीकांसाठी नगर परीषदे अंतर्गत तयार करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद मार्गावर प्रशस्त ईमारतीत नव्याने कोविड सेंटर सुरू केले आहे. आजपासुन मूलच्या जनतेसाठी ते कार्यन्वीत झाले आहे. यात दिडशे बेडची सोय कोविड रूग्णांकरीता केली असुन चोविस तास डॉक्टरची सोय, अॅम्बुलन्स, रूग्णांकरीता जेवन आणि स्वच्छ व व्यवस्थित सोय करण्यात आली असल्याची माहिती मूलचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी दिली.

उपजिल्हा रूग्णालयाच्या क्वार्टर मध्ये 75 बेडची सोय करण्यात आली होती. दिवसेंदिवस कोविड रूग्णांची वाढ होत असुन बेड फुल झाल्याने नविन रूग्णांना बेड मिळणार नाही. त्यामुळे रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मूल प्रशासनाने आजपासुन नगर परीषदे अंतर्गत शाळेसाठी नविन प्रशस्त बांधलेल्या ईमारतीत दिडशे बेडची सोय करण्यात आली आहे. यावेळी नविन कोविड सेंटरची पाहणी करतांना मूलचे तहसिलदार डाॅ.रंविंद्र होळी, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम,संवर्ग विकास अधिकारी मयुर कळसे, बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वसुले, नायब तहसिलदार यशवंत पवार आदी उपस्थित होते.
मूलच्या नागरीकांनी न घाबरता आणि कोविड विषयी माहिती न लपविता टेस्ट करून रूग्ण पाझिटिव्ह असल्यास नव्याने सुरू केलेल्या कोविंड सेंटर येथे उपचार घ्यावा. असे आवाहन मूल प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.