कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे- प्रशासनाचे आवाहन

35

मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यात आज अँटीजन तपासणीत एकही कोरोनाबाधीत आढळले नसले तरी माञ आरटीपीसीआर तपासणीमध्ये २२ कोरोनाबाधीत सापडले आहे. सावली तालुक्यात आरटीपीसीआर तपासणीत ४ आणि अँटीजन तपासणीत १० असे १४ जण बाधीत आढळले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात आज मूल आणि सावली तालुक्यात प्रत्येकी ३३१ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. मूल तालुक्यात पुन्हा कोरोना लस संपल्याने लसीकरणासाठी नागरीकांना पुन्हा एक दोन दिवस प्रतिक्षा करावी लागेल. असे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी कळविले आहे. मूल येथील कोरोना चाचणी केंद्रावर १४१ जणांनी आरटीपीसीआर तर ७७ जणांनी अँटीजन असे २१८ जणांनी तपासणी केली असुन मूल तालुक्यात आजपर्यंत १३८४४ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या १६७ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी १०९ जण गृह अलगीकरणात तर ५८ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मूल तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या पाच लसीकरण केंद्रापैकी आज मूल येथे २०० , मारोडा-५१, चिरोली-३०, राजोली-५० आणि बेंबाळ येथे लस संपल्याने आज लसीकरण झाले नाही. सावली तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय येथे ६०, बोथली-११५, पाथरी-२०, अंतरगांव-२२, सामदा-४४ आणि खेडी येथे ७० असे एकुण ३३१ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला, आज हरांबा येथे लसीकरणचं झाले नाही. सावली येथे आज ३१ जणांनी आरटीपीसीआर तर ९६ जणांनी अँटीजन असे १६७ जणांनी कोरोना तपासणी केली. सावली तालुक्यात आजपर्यंत १०५६७ जणांनी तपासणी केली असुन सावली तालुक्यात कोरोनाच्या १५९ अँक्टीव्ह रूग्णांपैकी ६९ जण गृह अलगीकरणात तर ९० जण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. उपविभागातर्गत येत असलेल्या मूल आणि सावली तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा कमी जास्त होत असला तरी नागरीकांनी सतर्कता न बाळगल्यास आकडा वाढण्यास फार काळ लागणार नाही. त्यामुळे नागरीकांनी कोरोना प्रादुर्भावा संबंधीच्या नियमांचे पालन करावे. अशी विनंती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, मूलचे तहसिलदार डाँ. रविंद्र होळी आणि सावलीचे तहसिलदार परिक्षित पाटील यांनी संयुक्तरित्या केली आहे.