मूल तालुक्यात आज सापडले २२ तर सावलीत ६ कोरोना बाधीत

58

मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यात आज झालेल्या आरटीपीसीआर आणि अँटीजन तपासणीमध्ये प्रत्येकी ११ असे एकुण २२ तर सावली तालुक्यात आरटीपीसीआर तपासणीत ६ आणि अँटीजन तपासणीत एकही जण बाधीत आढळलेला नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात आज मूल तालुक्यात ६६१ जणांनी तर सावली तालुक्यात ६९७ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. मूल येथील कोरोना चाचणी केंद्रावर १६१ जणांनी आरटीपीसीआर तर ७२ जणांनी अँटीजन असे २३३ जणांनी तपासणी केली आहे. मूल तालुक्यात आजपर्यंत १३६२६ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या १६६ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी १०४ जण गृह अलगीकरणात तर ६२ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मूल तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या पाच लसीकरण केंद्रापैकी मूल येथे ३१२, मारोडा-१०२, चिरोली-६७, राजोली-५० आणि बेंबाळ येथे १३० असे एकुण ६६१ जणांनी लसीकरण केले आहे. सावली तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय येथे ९०, बोथली-१८९, पाथरी-३६, अंतरगांव-१०५, सामदा-६६, हरांबा-१२१, आणि खेडी येथे ९० असे एकुण ६९७ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. सावली येथे आज ३१ जणांनी आरटीपीसीआर तर २४ जणांनी अँटीजन असे ५५ जणांनी कोरोना तपासणी केली. सावली तालुक्यात आजपर्यंत १०४४० जणांनी तपासणी केली असुन सावली तालुक्यात कोरोनाच्या १६६ अँक्टीव्ह रूग्णांपैकी ६७ जण गृह अलगीकरणात तर ९९ जण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. काल पासुन शासनाने अत्यावश्यक सेवा वगळुन लाँक डाऊन जाहीर केले. परंतु मूल शहरात शासनाचा लाँक डाऊन आहे की नाही ! याविषयी नागरीकांमध्ये चर्चा होती. कोरोनाची भिती न बाळगता जनजीवन जैसे थे दिसुन आले. परंतु शासनाच्या निर्देशामूळे स्थानिक महसुल व पोलीस प्रशासन हतबल ठरले. अशीच परिस्थिती भविष्यात राहील्यास शासनाला लाँक डाऊन अधिक कडक केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशी चर्चा आहे.