रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरी च्या वतीने रक्तदान शिबिर

43

ब्रम्हपूरी:- चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी येथेरिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरी च्या वतिने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य मागील वर्षीप्रमाने यावर्षीसुद्वा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने राज्यात रक्ततुटवडा निर्माण झालेला असून  रुग्णांना रक्त मिळावे याकरिता ख्रिस्तानंद रुग्णालय ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराला कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तब्बल दात्यांनी रक्तदान केले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रक्तदान करताना केशिप पाटील, डेनी शेंडे, रक्षित रामटेके, सिद्धांत फुलझेले, दिलीप शेंडे, अश्वदिप ठवरे, अमोल रंगारी, प्रणय लोखंडे, अमित धोंगडे, राहुल शेंडे आदि…तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.