कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सज्ज

58

मूल (प्रतिनिधी)
आज झालेल्या तपासणी मध्ये मूल तालुक्यात आरटीपीसीआर मध्ये १६ तर अँटीजन तपासणीत ७ असे २३ तर सावली तालुक्यात अँटीजन तपासणीत ०१ तर आरटीपीसीआर तपासणीत आज एकही जण बाधीत आढळलेला नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात आज मूल तालुक्यात ५३१ जणांनी तर सावली तालुक्यात ७८६ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. मूल येथील कोरोना चाचणी केंद्रावर १३० जणांनी आरटीपीसीआर तर १५ जणांनी अँटीजन असे १४५ जणांनी तपासणी केली आहे. मूल तालुक्यात आजपर्यंत १३३९३ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या १६१ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी ९५ जण गृह अलगीकरणात तर ६६ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मूल तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या पाच लसीकरण केंद्रापैकी उपजिल्हा रूग्णालय मूल येथे १२०, प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे १३९, चिरोली येथे ३८, राजोली-६० आणि बेंबाळ येथे १७४ जणांनी असे एकुण आजपर्यंत मूल तालुक्यात ७८३४ जणांनी लसीकरण केले आहे. सावली तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय येथे ८७, बोथली-२०६, पाथरी-१४, अंतरगांव-१०७,सामदा-६४, हरांबा-१५०, आणि खेडी येथे १५८ जणांनी लसीकरण केले आहे. सावली येथे आज १७ जणांनी आरटीपीसीआर तर ०२ जणांनु अँटीजन असे १९ जणांनी कोरोना तपासणी केली. सावली तालुक्यात आजपर्यंत १०३८५ जणांनी तपासणी केली असुन सावली तालुक्यात कोरोनाच्या १७३ अँक्टीव्ह रूग्णांपैकी ६९ जण गृह अलगीकरणात तर १०४ जण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचे मार्गदर्शनात मूल तालुक्यात तहसिलदार डाँ. रविंद्र होळी, संवर्ग विकास अधिकारी डाँ. मयुर कळसे, मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, वैद्यकीय अधिक्षक डाँ. उज्वल इंदोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ, सुमेध खोब्रागडे, डाँ. तिरथ उराडे, पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत आदी तर सावली तालुक्यात तहसिलदार परीक्षित पाटील, संवर्ग विकास अधिकारी निखील गावळे, मुख्याधिकारी मनिषा वझाडे, तालुका वैद्यकिय अधिकारी मनोहर मडावी, डाँ. धुर्वे आणि नायब तहसिलदार सागर कांबळे, ठाणेदार राठोड कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत.