आम्ही लस घेतली तुम्ही कधी घेणार ?नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर यंाचे आवाहन

56

आम्ही लस घेतली तुम्ही कधी घेणार ?नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर यंाचे आवाहन
मूल:-गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बंद झालेले लसीकरण पुन्हा कालपासून सुरू झाले आहे तरी 45वर्षावरील सर्वानी लसीकरण करून घ्यावे आपण सुरक्षित तर देश सुरक्षित असे आवाहन करत नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर यांनी ही स्वतःचे लसीकरण करून घेतले.
वॅक्सीनचा तूटवडा पडल्याने बंद झालेले लसीकरण पुन्हा सुरू झाले असले तरी पहिला डाव पहिला गडी म्हणून लसीकरण पूर्ववत सुरू झाले असून मोठ्या संख्येने लस घेण्यास नागरिक येत आहेत. मूल शहरात कन्नमवार सभागृह येथे व सरकारी दवाखान्यात लसीकरण सुरू आहे कोरोना नवे रूप घेऊन आला आहे.या संसर्गाविरूध्दची लढाई ही सामूहिक आहे. या लढाईचे शस्त्र लस हेच आहे .लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आम्ही कोरोनाविरूध्दची कवचकुंडली मिळविली आहेत

 

तुम्हीही ती मिळवा. कोरोनापासूनच्या बचावासाठी लस सुरक्षित आहे. लगतच्या लसीकरण केंद्रात तातडीने जा. प्रथम लस घ्या. त्यानंतरच दैनंदिन कामे करा . कोविडशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक आहे. नागरिकांनी याबाबत गैरसमज बाळगण्याचे काही कारण नाही. कोरोनावर मात करण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने लस घ्यावी आपण सुरक्षित तर देश सुरक्षित असे आवाहन करत नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर यांनी केले आहे.यावेळी नगरपालीकेचे मुख्याधिकरी सिध्दार्थ मेश्राम, व नायब तहसिलदार पवार, , लसीकरण केंन्द्रावर आरोग्य सेवीका ,लसीकरण नोदणी चालक उपस्थित होते.