राष्ट्रवादीचे नेते सुमीत समर्थ यांची निवड विद्युत वितरण सनियंत्रण समितीवर

66

राष्ट्रवादीचे नेते सुमीत समर्थ यांची निवड
विद्युत वितरण सनियंत्रण समितीवर ग्राहक प्रतिनिधी नेमणूक

मूल:- वीज पुरवठा हा अंत्यत महत्वाची बाब असून शहरी क्षेत्रात व गा्रमीण क्षेत्रात नियंत्रण समित्या गठीत करणे महत्वाचे असल्यामुळे वीज ग्राहक व वितरण कंपनी यांच्यात सुसंवाद व समन्वय व्हावा व ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा पुरवण्यासााठी, ग्राहकांच्या समस्या लवकर सोडवण्यात येतील .राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते सुमीत समर्थ यांची विद्युत वितरण सनियंत्रण समितीवर ग्राहक
प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण सनियंत्रण समिती जिल्हास्तरावर
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून,पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या समितीत जिल्हयातील सर्व आमदार,जि.प.अध्यक्ष,विधान परिषद सदस्य,महापैर,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक,सीईओ यांच्या सह
जिल्हास्तरीय विविध विभागाचे अधिकारी सदस्य व प्रतिनिधी असलेल्या 26 प्रतिनिधी आहेत.
येथील राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हयाचे सक्रीय व होतकरू कार्यकर्ते असलेले युवा नेते सुमीत समर्थ यांची जिल्हा
सदस्यपदी वीज वीतरण क्षेत्र गा्रहक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीबदल राष्ट्रवादी काॅेग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके,रयत पतसंस्थेचे
अध्यक्ष निमचंद शेरकी,राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाधर कुणघडकर,शहर अध्यक्ष,अर्चना चावरे, प्रा.किसन वासाडे,
महेश जेंगठे,गुरूदास गिरडकर,प्रशांत भरतकर,विनोद आंबडकर,दिनेश जिडीवार,अजय त्रिपत्तीवार,सूरज तोडसे,सोनल मडावी,
इत्यादींनी सुमीत समर्थ यांचे अभिनंदन केले आहे.