मूल तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण पुन्हा सुरू

43

मूल (प्रतिनिधी)
कोरोना प्रतिबंधक लसीकरण आजपासुन पुर्ववत सुरू झाले असुन आज मूल तालुक्यात ४६५ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. लसींच्या तुटवळ्यामूळे तालुक्यातील लसीकरण चार दिवसापासुन बंद होते, आज झालेल्या तपासणीत मूल तालुक्यात २१ जण कोरोनाबाधीत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील कोरोना चाचणी केंद्रावर ५८ जणांनी आरटीपीसीआर तर ५४ जणांनी अँटीजन असे ११२ जणांनी तपासणी केली आहे. मूल तालुक्यात आजपर्यंत १३२४८ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या १५६ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी ९२ जण गृह अलगीकरणात तर ६४ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मूल तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या पाच लसीकरण केंद्रापैकी उपजिल्हा रूग्णालय मूल येथे २०१, प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे ११०, चिरोली येथे ३४, राजोली- ४१ आणि बेंबाळ येथे ७९ जणांनी असे एकुण आजपर्यंत मूल तालुक्यात ७३०३ जणांनी लसीकरण केले आहे. ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे, मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ३५४५, मारोडा ११८२, चिरोली ११३५, अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या राजोली येथे ४८२ आणि बेंबाळ येथे ४९४ असे एकुण ६७९८ जणांनी लसीकरण केले आहे.