साधेपणाने गुढी उभारा- नगराध्यक्षा सौ.रत्नमाला प्रभाकर भोयर

62

साधेपणाने गुढी उभारा- नगराध्यक्षा सौ.रत्नमाला प्रभाकर भोयर
मूल:- हिंदू नववर्षाचे स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय,साडेतीन मुहूर्तापैकी हा एक
मुहूर्त समजला जात असल्याने गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्व आहे.पण यंदाचा गुढीपाडवाही गेल्या वर्षीसाराखा
कोरोनामय झाला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा साजरा करता येणार नाही याची जाणीव प्रत्येकाला आहे.
शिवाय हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सर्वच स्तरांतून केले जात आहे.
मात्र असे असले तरी यंदा आपल्या कुटुंबासोबत मिळून निरोगी आरोग्याची गुढी उभारून कोरोनावर मात करण्याचा
संकल्प करू या,असे आवाहन मूल येथील नगराध्यक्षा सौ.सौ.रत्नमाला प्रभाकर भोयर यांनी केले आहे.
मराठी महिन्याची सुरूवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण घरोघरी गुढी
उभारतात. एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बंाधतात. त्यावर चांदीचा गडू उपडा घालतात.
कडुलिंबाची डहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात .साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवून घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारतात.
गुढीपाडवा खासकरून महाराष्ट्रात साजरा केला जातो.लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र,कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसोबत मोठया उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनविले जाते.याशिवाय,गोड भातही बनविला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे परिस्थिती साामान्य नसून यंदा साधेपणाने घरात राहूनच गुढी उभारा, असे नगराध्यक्षा सौ.रत्नमाला प्रभाकर भोयर यांनी कळविले आहे.

खरेदीचा मोह टाळा, यंदा आरोग्याच्या हितासाठी पूजेच्या सहित्याची खरेदी न करताच गुढीपाडवा साजरा करणे गरजेचे आहे.घरी असेल त्या वस्तुंचा वापर करून सण साजारा करू या. – नगराध्यक्षा सौ.रत्नमाला प्रभाकर भोयर